सहकार महर्षी बाळासाहेब केदार मार्केट यार्ड, मेन रोड, काटोल ता. काटोल जि. नागपुर.

काटोल कृषि उत्पन्न बाजार समिती अ वर्गीकृत बाजार समिती आहे. काटोल कृषि उत्पन्न बाजार समितीची स्थापना दिनांक. 29 जुलै 1940 ला झाली असुन प्रत्यक्ष कामकाजाची सुरुवात ही त्याच दिवशी झाली. काटोल कृषि उत्पन्न बाजार समिती कडे उपलब्ध असलेल्या जागेमध्ये 3 बाजार आवारांचा समावेश आहे. 1) मुख्य बाजार आवार काटोल, 2) उपबाजार आवार काटोल, 3) उपबाजार आवार कोंढाळी,

कृषि उत्पन्न बाजार समितीचा मुख्यबाजार हा काटोल-नागपुर या मुख्य मार्गावर लागुन आहे दिनांक 11 जानेवारी 1990 रोजी हा बाजार मुख्यबाजार आवार म्हणुन घोषीत झाला. मुख्य बाजार आवार काटोलचा परिसर 6.10 हेक्टर (15.07 एकर) आहे. या बाजार आवारात समितीचा दैनिक धांन्य बाजार सुरू असतो. तसेच येथेच आठवडयाच्या प्रत्येक मंगळवारला जनावरांचा बाजार भरविण्यात येतो. तसेच हंगामात संत्री, मोसंबी चाही बाजार येथेच सुरू असतो.

समितीचा धांन्याचा बाजार उपबाजार आवार काटोल येथे भरविण्यात येत होता परंतु सदर बाजार आवाराची जागा अपुरी पडत असल्याने दिनांक 01 मार्च 2013 रोजी पासुन धांन्याचा बाजार मुख्य बाजार आवारात स्थलांतरीत करण्यात आला समितीच्या या बाजार आवारात एकुण 05 लिलाव शेड आहे.

यापैकी 1 संत्रा लिलाव शेड जुने असुन 4 धांन्य लिलाव शेड नव्याने बांधण्यात आलेले आहे. तसेच याच आवारात समितीने 60 मे. टन क्षमतेचा वे-ब्रिज लावण्यात आलेला आहे. 2500 मे. टन क्षमतेचे 02 गोदाम, गुरांकरीता 03 लिलाव शेड, शेतकरी गृह, डॉक्टर कॅबिन, कार्यालय तसेच समितीचे कार्यरत संचालक मंडळाने याच बाजार आवारात सुलभ शौचालयाचे बांधकाम केलेले आहे. समितीचे प्रशासकीय कार्यालयीन ईमारत याच बाजार आवारात आहे.

या बाजार आवारात मुख्यत: सर्व प्रकारची नियमित कृषिमाल या शेतमालाची आवक होते येथे येणाऱ्या नियमीत कृषि मालामध्ये सोयाबिन, तुवर, चना, ज्वारी, भुईमुंग शेंगा, गहु, उडिद, मुग व तिळ या मालाचा प्रामुख्याने समावेश होतो. या बाजार समितीच्या क्षेत्रातील गावात व खेडयापाडयात धान्य व भुईमुंगाचे उत्पादन साधारनत: बरे होते अश्या खेडयापाडयातुन विक्री करीता येनारा माल दुकाना मध्ये विकुन होनारे शेतकऱ्याचे नुकसान टाळता यावे म्हणुन हा सर्व माल समितीच्या बाजार आवारातच विक्री व्हावा असे या समितीचा कटाक्ष आहे.

नागपुर जिल्हातील येथील संत्री जगप्रसीध्द असुन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्यात केला जातो. काटोल येथुन दिल्ली, मुंबई, बिहार, पं. बंगाल, कर्नाटक, ओरीसा, गुजरात, राजस्थान, आंध्रप्रदेश तसेच देशाच्या निरनिराळया भागात संत्राच्या मागणी प्रमाणे व्यापाऱ्यांमार्फत विक्री करीता पाठविण्यात येते. काटोल येथिल जनावरांचा बाजार विदर्भातील वर्षभर भरणाऱ्या जनावरांचा बाजारा पैकी एक बाजार आहे. ज्यामुळे समितीच्या वार्षिक उत्पन्नात मोलाची भर पडली येथे जनावरांच्या बाजारासाठी प्रशस्त अशी जागा असुन जनावरा करीता पिण्याच्या पाण्यासाठी दोन हौद आहेत. त्यांच्या चाऱ्या करीता बैल बंडीव्दारे चारा आनुन विक्री करण्यात येते. येथील सुविधा पाहुन येथे मध्यप्रदेश, छत्तीसगड, तसेच विदर्भातुन दुरदुरुन व्यापारी गुरांची खरेदि करण्याकरीता येतात.

कृषि उत्पन्न बाजार समितीव्दारे या विस्तीर्ण अश्या बाजार आवाराच्या संरक्षणासाठी तसेच शेतकऱ्याच्या मालाच्या संरक्षणासाठी तारेच्या फेन्सींग ची व्यवस्था करण्यात आलेली आहे. बाजार समितीव्दारे या विस्तीर्ण अश्या आवाराच्या प्रकाशयोजनेसाठी विद्युत पोलसहीत ईलेक्ट्रीक लाईट ची व्यवस्था करण्यात आलेली आहे. कृषि उत्पन्न बाजार समिती व्दारे या बाजार आवारात पाणी पुरवठयासाठी एक विहीर आहे ज्यांव्दारे या बाजार आवारामध्ये मुबलक पाण्याची सोय झालेली आहे मूख्य बाजार आवारालगतच्या कृषि उत्पन्न बाजार समितीच्या मालकीच्या जागेवर महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, पुणे केंद्र काटोलला गोदाम बांधलेले आहे या गोदामाचा आकार 3020.60 चौ. मी. आहे. या गोदामाची स्थापीत क्षमता 5850 मे. टन इतकी आहे. या गोदामाच्या स्थापीत क्षमतेचा 100% वापर होत आहे.